शैक्षणिक सुविधा

शैक्षणिक सुविधा–

  1. गावामध्ये 13 अंगणवाडया.
  2. 6 प्राथमिक शाळा.
  3. 2 माध्यमिक शाळा.
  4. 1 खाजगी शाळा आहे.
  • 1867 साली अंकलखोप गावी प्राथमिक शाळा स्थापन झाली. आरंभी या शाळेत फक्त 49 मुले शिकत होती त्यावेळी शिक्षकाला साडेसात रुपये पगार होता. आज कन्या शाळा अंकलखोप मुलांची शाळा औदुंबर राडेवाडी मळीभाग अशा शाळा आहेत. 1923 साली सातवीचा प्रथम वर्ग नानासाहेब गुरव यांनी सुरु केला. दाजी गुरुजी हे या गावचे प्रसिध्द शिक्षक होते. याशिवाय रा. के जोशी गुरुजी नदाफ गुरुजी, एस.आर. चौगुले, के.डी. नाना पाटील यांनी शिक्षणाचा पाया घातला.

मान्यवर शिक्षण संस्था–

  • पुर्वी शिक्षक प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेकडे हुतात्मा भगतसिंह हायस्कूल होते. ते सन 2001–2002 ला भारती विद्यापीठ पुणे या संस्थेला हस्तांतरीत करण्यात आले आहे.

क्षमता आणि वैशिष्टये–

  • भारतीय विद्यापीठ या संस्थेची क्षमता अफाट समुद्रासारखी आहे. अंकलखोप येथे विद्यापीठाच्या वतीने मोठे संकुल उभा करण्याचा मनोदय मा. पतंगराव कदम यांचा आहे. 2 कोटी रुपये खर्च करुन मोठे शिक्षण संकुल भविष्यात अंकलखोप या ठिकाणी उभे राहणार आहे या सध्याच्या इमारती सारखी इमारत याठिकाणी उभी राहणार आहे. या संस्थेचे वैशिष्टये असे की अगदी शुन्यातुन उभी राहीलेली शिक्षण संस्था आज परदेशात जाऊन पोहचली आहे. तिच्या अनेक शाखा आज मोठया शहरात व खेडयात पसरलेल्या आहेत. भारतीय विद्यापीठाला अभिनव विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. सुंदर इमारती उच्च प्रतीचे शिक्षण व वाढती लोकप्रियता ही या संस्थेची वैशिष्टये आहेत.