आरोग्य

आरोग्य सुविधा–

गाव भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्यात येते. तसेच अंकलखोपला उपकेंद्र आहे. 3 खाजगी दवाखाने आहेत. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापासून म्हणजे 2001–02 पासून खाजगी दवाखाने कमी झालेले आहेत. श्री. श्रीकांत खंडू चौगुले यंचे शिक्षण 10 वी असून ते त्वचारोग, संधीवात, दमा, खोकला, मुळव्याध, मधुमेह, मुतखडा, कावीळ, पांढया व तांबडया धुवणीवर इत्यादी रोगावर व आजारावर आयुर्वेदीक औषधोपचार करतात.