राजकीय व्यक्तिमत्वे

राजकीय व्यक्तिमत्वे

सामाजिक चळवळ:

1912 ते 1925–26 सालापर्यंत महाराष्ट्रात सत्यसमाज चळवळीचा वाढता जोर होतो. या गावात त्यावेळी येथील सुशिक्षित नागरिक बाबासाहेब पाटील यांनी या चळवळीची जोपासना करुन गावात जागृती निर्माण केली होती. बहुजन समाज ब्रम्हणशाहीच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होवू पहात होता. धर्माच्या भाभडया समजुती रुढी तडातड तोडल्या जात होत्या भाऊराव पाटलांनी तर औदुंबर यात्रेत बहुजन समाजाच्या अफाट सभातून योजस्वी भाषणे होत. भटशाही, निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, शिक्षण प्रसार, स्त्री शिक्षणाची जोपासणा, आदी विषयावर बौध्दिके दिली जात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तेजस्वी भाषणाचा परिणाम या भागातील तरुण मनावर झाला. नविन विचार जन्माला आले.

राजकीय चळवळ:

1930 सालापासूनचा कालखंड अंकलखोप गावच्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे. राजकीय घटनांनी गावाचा कायापालट झाला. 1930 साली महात्मा गांधीनी असहकाराची चळवळ सुरु केली लोक स्वतंत्र लढयात सामील होऊ लागले. प्रभात फेरी, विदेशी कपडयांच्या होळया पेटू लागल्या कै. धुळाप्पाणा नवले, कै. दत्ताजीराव सुर्यवंशी हे दोन नव तरुण या चळवळीत आकर्षित झाले. त्यांनी युवक गोळा केले. नही रखना, नही रखना, जालीम सरकार नही रखना या गीताने अंकलखोप परिसर दुमदुमून गेला. वैयक्तिक सत्याग्रहास सुरुवात झाली. तासगाव तालुक्यातून तीन सत्याग्रही निवडले गेले. त्यामध्ये कै. धुळाप्पाणा नवले, कै. दत्ताजीराव सुर्यवंशी यांनी गावाला नवी दिशा दिली. कॉग्रेसच्या राष्ट्रीय विचार सरणीने सारा गाव वेडा झाला. राजकीय क्षेत्रात या दोघांचा मोठा मान आहे. त्यांच्या कतृत्वामुळे गावची किर्ती महाराष्ट्रात दुमदुमली. त्याकाळी प्रामुख्याने स्वातंत्र सैनिकांची फळी निर्माण झाली. कै. दाजी गुरुजी पाटील, कै. बाबूराव बिरनाळे कै. शंकरबन बुवा कै. राम नायकवडी कवी सुधांशु, नामदेव हजारे कै. शिवाप्पा शेटे नाभिराज नवले, यशवंत नवले कै सातलींग विभूते कै. बाळू नाना बिरनाळे कै. शिवलींग स्वामी कै. ताई बिरनाळे यांनी अनेक लढयात गावचे नेतृत्व केले.

राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाया व्यक्ती–

कै. दत्ताजीराव सुर्यवंशी–

स्वातंत्र्याच्या काळात कै. तात्यांना जनतेने मोठया प्रेमाने आपला प्रतिनिधी निवडून आमदार केले. गावातील सार्वजनिक अथवा राजकीय कोणताही विषय असो कै. तात्या जनतेला मार्गदर्शन करीत होते. दु:खी मानसाला धीर देत होते जिल्हयातील शेती, सहकार आणि ग्रामरचनेत त्यांनी अत्यंत तळमळीने कार्य केले. महाराष्ट्राच्या राजकारणात शेती व सहकारात ठसा उमटविला.

कै. धुळाप्पाणा भाऊराव नवले–

कै. आण्णा विधान परिषदेवर सदस्य म्हणून कार्यरत होते कष्टी जिवांना उत्साहीत करण्याचे त्यांनी कार्य केले. आण्णा म्हणजे अंकलखोप आणि अंकलखोपचे नाव घेताच आण्णा डोळयासमोर येतात. गावातील प्रशस्त रस्ते, धर्मशाळा, ओढयावरील पूल, नदी काठची वृक्षसंपदा ही आण्णांच्या कार्याची साक्ष आहे. सांगली जिल्हा कॉंग्रेसचे एक कर्तबगार अध्यक्ष म्हणून त्यांचेकडे पाहीले जात होत. सांगली साखर करखाण्याचे एक वेगळेच उपाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द रंगली, गावाच्या राज्याच्या जिल्हयाच्या राजकारणात स्वर्गीय वसंतराव दादांचे ते विश्वासू सहकारी होते.

श्री. के.डी. पाटील–

अंकलखोपचे प्रसिध्द पराडमुख असे कायद्याचे तज्ञ आहेत तळमळीने अपार कष्ट घेणारे सदग्रहस्त बी.ए.एल.एल.बी. होऊनही ते शेती करतात. ऑननरी मॅजिस्टेट म्हणून त्यांची कारकीर्द उत्कृष्ट झाली ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांनी गावात मोठया सुधारणा करुन आणल्या अंकलखोप औदुंबर रस्ता, समाज मंदिरे, वाळवे रस्त्यावरील फरशी पूल, रस्ता कडेची झाले, साक्षरता प्रसार जुन्या शाळांचे पुनरुज्जिवन या गोष्टी त्यांच्या कामाची साक्ष देतात. एक जातीवंत शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द फुलली भगतसिंग हायस्कूल अप्रतीम सुंदर सर्वसोयींनी युक्त अशा इमारतीची त्यांनी 1952 साली 13 लाख रुपयांची उभारणी केली म्हणून त्यांना समाजभूषण व समाजरान पुरस्कारांनी सन्मानिम करण्यात आले आहे. नाना स्वतंत्र विचारांचे भोक्ते आहेत योग्य व न्याय बाजूची त्यांनी नेहमीच पाठराखण केली आहे. राज्याच्या शिक्षण नानंाचा प्रभाव मोठा आहे.

कै. दिनकरराव हिंदुराव पाटील–

बापू हे अंकलखोपचे कर्तबगार आदर्श शेतकरी म्हणून परिचित होते. अंकलखोपच्या शेती मशागती मध्ये आमूलाग्र बदल केले. अंकलखोप मध्ये ऊस शेती त्यांनी सुरु केली. शेतीला पतपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी 1922 साली वि.का.स. सोसायटीची स्थापना केली. महाराष्ट्रात सहकारातील एक आदर्श सोसायटी म्हणून तिचा नावलौकिक आहे. कृष्णा नदीवर इंजिन बसवून त्यांनी शेतीला पाणी देण्याची किमया केली. त्याचबरोबर अंकलखोप 400 एकर शेतीवर पहिल्यांदा ड्रीप इरिगेशन स्किम राबविली. सहकार तत्वारील ती मोठी क्रांती त्यांनी घडवून आणली. पुरोगामी विचाराचे नागरीक म्हणून त्याची कारकीर्द केली. बापूंनी सहकारातील आदर्श असणारा सांगली शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून चांगली कारकीर्द केली. त्यांचा सर्वांना अभिमान आहे.

श्री. ह. न. जोशी उर्फ़ कवी सुधांशू–

एक आदर्श साहित्य याकामी म्हणून कार्य महाराष्ट्र शासनाने पद्मश्री हा उच्च बहुमान देऊन त्यांच्या कार्याची पावती त्यांना दिली आहे. सरपंच म्हणून ही त्यांचे कार्य गौरवपूर्ण असे आहे. समाजकारणामध्ये त्यांनी आदर्श प्रणाली आणून गावाचा कारभाराचा लौकीक वाढविला आहे. साहित्य व समाजकारणामध्ये त्यांनी उच्च किर्ती संपादन केली आहे. दत्त दिगंबर दैवत माझे या गीताने त्यांनी महाराष्ट्राच्या नकाशावर अंकलखोपचे नाव आजरामर केले आहे.