व्यक्तिमत्वे

–आदर्श व्यक्तिमत्वे–

कै. निवृत्ती दादा सुर्यवंशी–(धनिमहाराज)–

हया व्यक्तिस अंकलखोप गावच काय? आसपासच्या सर्व गावात धनिमहाराज म्हणून ओळखले जात कारम ते नावाप्रमाणे धनिमहाराज होते. प्रत्येक एकादशिस पंढरपुर आळंदिस जात. वर्षातून दोनवेळा चालत देवदर्शन करीत. त्यांच्याकडे गेलेला कोणताही गृहस्थ मोकळया हाताने कधीही परत जात नाही एवढे ते दानशूर होते.

गावातील कै. आबा राया जाधव हा मोढा पैलवान होता परंतु परिस्थिती गरीबीची असलेने पोटाचे हाल होते हे धनिमहाराजांना समजताच त्यांनी या पैलवानास 4 एकर बागायत जमिन दान केली.

गावामध्ये ऊसशेतीस नदीवरुन पाणी उचलनेस पहिल्यांदा इंजिनचा वापर केला ऊसापासून गुळ तयार करणेची सुरुवात पहिल्यांदा त्यांनी केली.

आपला भारत स्वतंत्र झाला त्या 1947 या वर्षी स्वखर्चाने रु.500/– खर्च करुन गावात मध्य चौकात ध्वजका उभा केला आजही त्या चौकास झेंडाचौक म्हणून ओळखले जाते व सार्वजनिक राष्ट्रीय सनास झेंडा फडकवला जातो. असे धनिराज नावाप्रमाणे धनी होते.

श्री. ज्ञानेश्वर गोविंद कोळी–

जगणे माझे, आयुष्याच्या वाटेवर, आकाश पेलताना घन दाटलेले छावणीच्या कविता, आठ आण्याचा गुळ, माणूस, वेदनांचे प्रवाशी त्यांची कविता ललीत व काव्यसंग्रह प्रकाशित झाली आहेत. कथा कविता लेखनाबरोबर 1983 पासून दैनिक पुढारी, तरुण भारत, लोकमत, सकाळ व महासत्ता या दैनिकात पत्रकार म्हणून लेखन. त्यांना 1991 ते 2008 पर्यंत 14 पुरस्कार मिळालेले आहेत.

श्री. सर्जेराव आनंदराव सुर्यवंशी–

शिक्षण बी.इ. मेकॅनिकल झाले आहे सध्या ते नॅशनल हेवी इंजिनर को. आॅड लि पुणे येथे डेपोटी मॅनेजर म्हणून काम पाहतात. नोकरी निमित्ताने ते आफ्रीका, ऑस्ट्रेलिया, निलीपाईन्स, सिंगापूर, मोरोक्को, इजिप्त, केनिया या देशात काम केले सध्या त्यांचे काम इंडीया व केनिया मध्ये चालू आहे.

श्री. राजेंद्रकुमार माणिकराव खामकर–

शिक्षण एम.ए.बी.एड्., बी.जे., –गोल्ड मिडल–पत्रकारिता गेली 10 वर्षापासून करतात. त्यांना इ स 2003–04 मध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार इ. स. 2008 मध्ये नारायणानंद तीर्थ स्वामी सेवा ट्रस्ट औदुंबरच्या वतीने समाजसेवा पुरस्कार मिळाला आहे.

श्री. भास्कर निळकंठ चौगुले–

शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड. अखिलभारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून परिसरामध्ये कायदेविषयक नियोजन, ग्राहकांची फसवणुक होऊ नये यासाठी प्रबोधन, मोफत मार्गदर्शन केंद्रातुन खते बियाणे या संदर्भात व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील हायस्कूल कॉलेज तसेच शासकीय कार्यालयातील प्रबोधन शिबीरात सहभाग मोफत वैद्यकीय शिबिरांचे नियोजन मा. एन.डी. पाटीलसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या राज्य इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून शेतकयांची शेती पंपाची शेतीमालाचे दर याबाबतीत शेतकयांना लाखो रुपयांच्या सवलती मिळवून देण्यामध्ये सहभाग स्व. निळकंठ नाना विचारमंचच्या माध्यमातुन चाललेल्या सामाजिक प्रबोधनामध्ये सहभाग. पलूस कृषी उत्पादन बाजार समिती यांना विनंती अर्ज करुन आद्रता मशीन बसवून सोयाबिन आद्रतेसंदर्भात व्यापायांकडून होणारी शेतकयांची फसवणूक कमी करण्याचा प्रयत्न ग्रामस्वच्छता अभियान व म. गांधी तंटामुक्त गाव या शासनाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग.

कृषी विभाग प्रमुख अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा सचिव सांगली जिल्हा इरिकेशन फेडरेशन व्हा. चेअरमन श्री. शिवाजी लिफ्ट स्किम नं.4 अंकलखोप संस्थापक सदस्य जिजामाता बालक मंदिर अंकलखोप सदस्य म. गांधी तंटामुक्त अभियान.