धार्मिक कार्यक्रम

–गावातील ग्रामदैवत व इतर धार्मिक कार्यक्रम–

  • म्हसोबा–

म्हसोबा गावचे आराध्य दैवत गावाच्या पुर्वेस चिंचबनात या देवतेचे मंदिर आहे. याचा इतिहास प्रभु रामचंद्रापर्यंत आह. पाडव्यानंतर चैत्र महिन्यात 7 व्या दिवशी नक्षत्रानुसार या देवतेची मोठी यात्रा भरते.

  • अंकलेश्वर–खोपेश्वर–

पूर्वेस गावामध्ये येताना खोपेश्वर आणि पश्चिमेस अंकलेश्वर या दोन शिवमंदिराच्या कृपाछायेत गावची वास्तुभूमी आहे. शिवरात्रीला या दोन देवालयाची लहान यात्रा भरते.

  • श्री. सिध्देश्वर–

गावाच्या पश्चिमेस एक सिध्द पुरुषाची समाधी आहे. जेथे त्याचा आश्रम होता तो धनगर समाजाचा होता. धनगर त्याचे भक्त झाले या सिध्द पुरुषाचे सुंदर मंदिर भक्तांनी बांधले भक्तमंडळीमध्ये गडदे व हजारे हे प्रमुख आहेत.

  • लिंगायात साधुचा मठ–

येथे एक बसवेश्वराचा मठ आहे त्याची आख्यायिका आहे या देवाप्रित्यर्थ जेवताना तुप पुरवण्याचे काम होते. ते तुप नेण्यास आला त्यावेळी सकुरुशीणी सांगीतले की नऊ माठ तुप कृष्णेकडून उसणे आणा त्यावेळी नऊ माठ कृष्णेचे पाणी आणले त्याचे तूप झाले त्याचा समारंभ झाला. नंतर ते तुप कृष्णेत नेवून ओतून उसनावर घेतलेले तुप फेडले. अशी कथा आहे. बसवेश्वर जयंतीला या मठात विविध कार्यक्रम होतात.

  • जैनसमाजाची सुंदर वस्ती आहे. वस्तीचे नविन बांधकाम चालू आहे. कृष्णा तिरावर वस्ती डौलाने उभी आहे.
  • मुस्लीम समाजाची मध्यवस्तीत मशिद आहे. तेथे दररोज नमाजाकरिता मुस्लीम बांधव एकत्र येतात.
  • भारतीबुवाचे दोन मठ आहेत.
  • मारुती देवस्थान लोकवगणी खर्च करुन बांधलेल आहे.
  • विठठल मंदिर आहे.
  • औदुंबर ही अंकलखोपची वाडी असून येथे दत्तजयंती व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.