माझे गाव

अंकलखोप,

ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना–

सांगली जिल्हयाच्या उत्तरेस सांगलीपासून 30 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या तिरावर अंकलखोप वसले आहे. सरासरी 567 मिटर अक्षांसावर हे गाव बसल्याचे दिसते. दक्षिण गोलार्धात 17.0158 अक्षांसावर व पूर्वगोलार्धात 74.44038 रेखांशावर गावाचे ठिकाण आहे.