अंकलखोप ग्राम

पूर्वेस गावामध्ये येताना खोपेश्वर आणि पश्चिमेस अंकलखोप या दोन शिवमंदिराच्या कृपाछायेत गावाची वास्तूभूमी आहे. या दोन मंदिरावरुनच गावाला अंकलखोप हे नाव पडले आहे. अंकलेश्वराची मूर्ती रमणीय आहे तर खोपेश्वराचे शिखर उत्तुंग व प्रेक्षणिय आहे. सांगली जिल्हयाच्या उत्तरेस सांगलीपासून 30 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या तिरावर अंकलखोप वसले आहे. सरासरी 567 मिटर अक्षांसावर हे गाव बसल्याचे दिसते. दक्षिण गोलार्धात 17.0158 अक्षांसावर व पूर्वगोलार्धात 74.44038 रेखांशावर गावाचे ठिकाण आहे.